ओला दुष्काळ जाहीर करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरपाई द्या

 

जामनेर, प्रतिनिधी । अतिवृष्टीमुळे शासनाने ओला दुष्काळ जाहीर करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तत्काळ भरपाई द्यावी अशी मागणी संभाजी ब्रिगेडने तहसिलदार अरुण शेवाळे यांना देण्यात आलेल्या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

निवेदनाचा आशय असा की, अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या हाता तोंडाशी आलेला माल खराब झाला असून शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी शासनाने ओला दुष्काळ जाहीर करुन ५० हजार रुपये हेक्टरी नुकसान भरपाई द्यावी. तसेच कांदा निर्यात बंदी उठवावी , कर्ज माफी योजनेत पाञ शेतकऱ्यांना अजुनही कर्जमाफी मिळत नाहिये, तो लाभ तात्काळ मिळावा. नवीन पिक कर्जे उपलब्ध करुन द्यावी. काही बँका शेतकऱ्यांना कर्जे देण्यास टाळाटाळ करीत असून त्यांना योग्य ती समज देऊन शेतकऱ्यांना न्याय द्यावा. या सर्व मागण्याविषयी योग्य ती कार्यवाही करुन आर्थिक विवंचनेत असलेल्या शेतकऱ्यांना तात्काळ दिलासा द्यावा अन्यथा संभाजी ब्रिगेडतर्फे आपल्या स्टाईलने तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे. याप्रसंगी संभाजी ब्रिगेडचे जिल्हा प्रचार प्रसार प्रमुख मनोजकुमार महाले, जिल्हा उपाध्यक्ष प्रदीप गायके, जिल्हा सचिव अमोल पाटील, तालुकाध्यक्ष गोपाल पाटील, तालुका सचिव प्रविण गावंडे , सहसचिव राम अपार, तालुका उपाध्यक्ष प्रदीप भोईटे, संदीप पाटील, रियाज पिंजारी, सुनिल कानडजे , सावता सेना जिल्हा युवाध्यक्ष कृष्णा यादव माळी,आदी उपस्थित होते.

Protected Content