

चाळीसगाव, प्रतिनिधी ।कोरोनाचा वाढता प्रकोप लक्षात घेऊन तालुक्यातील चैतन्य तांडा येथे आज जेष्ठ नागरिकांची कोव्हीड रॅपिड टेस्ट करण्यात आली असून सर्वांचे अहवाल नेगिटीव्ह आले.
करगांव विकास सोसायटीचे माजी चेअरमन दिनकर राठोड यांच्या पुढाकाराने आज रविवार दि. १४ मार्च रोजी सकाळी चैतन्य तांडा येथे जेष्ठ नागरिकांनी कोव्हीड रॅपिड टेस्ट करण्यात आली. यावेळी एकूण पंचवीस जणांनी टेस्ट केली असता सर्वांचे अहवाल नेगिटीव्ह आले. करगाव उपकेंद्र व ग्राम पंचायत चैतन्य तांडा यांच्या संयुक्त विद्यमाने टेस्ट करण्यात आली. ही टेस्ट केवळ ६० वर्षांवरील नागरिकांची करण्यात आली. दरम्यान गावातील जेष्ठ नागरिक स्वतः पुढे येऊन कोव्हीड रॅपिड टेस्ट करून घेतली. याप्रसंगी माजी चेअरमन दिनकर राठोड, सरपंच अनिता राठोड, उपसरपंच आनंदा राठोड तसेच ग्रामपंचायत सदस्य वसंत राठोड, प्रवीण चव्हाण, डॉ. घनश्याम राठोड, अशा सेविका कविता जाधव, मधुकर राठोड, खिमा राठोड, मोरसिंग राठोड, अरविंद राठोड आदी उपस्थित होते.


