एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी हजारे यांना जामीन मंजूर

जळगाव प्रतिनिधी । गुन्ह्यात नाव असलेल्या आरोपीकडून १५ हजाराची लाच घेणाऱ्या एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप हजारे याला जिल्हा व सत्र न्यायालयाने कॅश सेक्यूरीटीवर जामीन मंजूर केला आहे.

तक्रारदार हा एका गुन्ह्यातील गुन्हेगार आहे. गुन्ह्यात नाव असल्याने लोकसेवक सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप हजारे याने गुन्ह्यात मदत करण्यासाठी ३० हजाराची मागणी केली होती. तडजोड करण्यासाठी १५ हजारांची मागणी सपोनि हजारे याने मागितली होती. यामुळे तक्रारदाराने नाशिक येथील एसीबीकडे तक्रार केली होती. यानुसार नाशिकच्या पथकाने १९ डिसेंबर रोजी दुपारी २ वाजता सापळा लाऊन सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप हजारे यांना अटक केली होती. न्यायालयीन कोठडी दिल्यानंतर आज जामीनासाठी न्या. आर.जे.कटारिया यांच्या न्यायालयात अर्ज केला असता न्यायालयाने २५ हजार सुरक्षा ठेव जमा करून जामीन मंजूर केला आहे. सरकार पक्षातर्फे ॲड. मोहन देशपांडे तर आरोपी तर्फे ॲड. कुणाल पवार, ॲड. मोहन पाटील आणि ॲड. गणेश सावळे यांनी कामकाज पाहिले.

Protected Content