जिल्हा रूग्णालयात दिव्यांग प्रमाणपत्रांसाठी दिव्यांग मंडळ आजपासून पुन्हा कार्यान्वित (व्हिडीओ)

जळगाव प्रतिनिधी । जळगाव जिल्हा शासकीय वैद्यकिय महाविद्यालय व रूग्णालयात नॉन कोवीड सुविधा पुर्ववत झाल्यानंतर आज बुधवार २३ डिसेंबर पासून दिव्यांग मंडळ कार्यान्वित होत असून प्रमाणपत्र देण्याबाबत कार्यवाही करण्यास सुरूवात करण्यात आली आहे. आज ८० दिव्यांग बांधवांची तपासणी करण्यात आली आहे.

शासकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद, उपअधिष्ठाता तथा दिव्यांग मंडळाचे समन्वयक डॉ. मारूती पोटे, वैद्यकिय अधिक्षक डॉ. वैभव सोनार यांनी काल मंगळवारी पाहणी केली होती. दिव्यांग बांधवांच्या होत असलेल्या असुविधेबाबत अनेक दिवसांपासून ही प्रमाणपत्र देण्याबाबत नियोजन सुरू होते. दर बुधवारी वैद्यकीय तपासणी सकाळी १० ते दुपारी १ वाजेपर्यंत केली जाणार आहे. ही तपासणी मुख्य गेट नं २ कडील अधिष्ठाता कार्यालयासमोरील दिव्यांग मंडळाच्या कार्यालयात सुरूवात करण्यात आली आहे. यावेळी २१ प्रकारच्या विविध तज्ञ तपासणी करून त्यानुसार प्रमाणपत्र दिले जात आहे. आज आयोजित केलेल्या दिव्यांग मंडळाच्या वतीने ८० जणांची तपासणी करण्यात आली असून त्यांना प्रमाणपत्र देण्यात आले आहे.

यावेळी उपअधिष्ठाता तथा दिव्यांग मंडळाचे समन्वयक डॉ. मारुती पोटे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. वैभव सोनार यांच्यासह तज्ज्ञ डॉ. आस्था गनेरीवाल, डॉ. सचिन अहिरे, डॉ. विजय कुरकुरे, डॉ. स्वप्नील कळसकर, डॉ. दिलीप महाजन, डॉ. अक्षय सरोदे, डॉ.प्रसन्न पाटील यांनी दिव्यांगांची तपासणी केली. कर्मचारी गोपाल सोळंके, चेतन निकम, दत्तात्रय पवार यांनी सहकार्य केले.

लाभार्थींनी प्रमाणपत्रासाठी सुरूवातीला ( www.swavlambancard.in ) या संकेतस्थळावून जावून अर्ज भरणे अनिवार्य आहे. या अर्जाची प्रिंट काढून अर्जासह आधारकार्ड, रेशनकार्ड, पासपोर्ट दोन फोटो व जून दिव्यांग प्रमाणपत्र तथा संबंधित कागदपत्र घेवून शासकीय रूग्णालयात दर बुधवारी लाभार्थ्यांनी उपस्थित रहावे. तपासणीची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर प्रमाणपत्र घरपोच पुढील आठ दिवसात संकेतस्थळावर प्रिंट काढन लाभार्थ्यांला मिळणार आहे. दिव्यांग मंडळ या सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा वैद्यकिय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांनी केले आहे.

 

https://www.facebook.com/508992935887325/videos/678215356181552

Protected Content