अपघातातील जखमी व्यक्तीचा उपचारादरम्यान मृत्यू

sanjay joshi

जळगाव प्रतिनिधी | दुचाकीने कामावर जाणारा एक प्रौढ व्यक्ती अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिल्याने गंभीर जखमी झाल्याची घटना पूर्वीच घडली होती. या जखमी व्यक्तीचा आज (दि.२५) उपचारादरम्यान मध्यरात्री मृत्यू झाला असून वरणगाव पोलिसात अशी नोंद करण्यात आली आहे.

 

याबाबत अधिक माहिती अशी की, संजय जोशी नरसय्या (वय ४५) रा. अंजनसोंडे ता. भुसावळ हे रंग देण्याचे काम करतात. दुचाकीवरून वरणगावाकडे जात असताना समोरुन येणार्‍या अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिल्याची घटना १९ सप्टेंबर रोजी घडली होती. त्यांना तातडीने एका खासगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले होते. मध्यरात्री २.३० च्या सुमारास उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला आहे.

Protected Content