जागतिक सुर्यनमस्कार दिनानिमित्त विद्यार्थ्यांना दिले सुर्यनमस्कारचे धडे !

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । रथसप्तमी अर्थात जागतिक सुर्यनमस्कार दिनाच्या निमित्ताने देशभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. या अनुषंगाने योग विद्या गुरुकुल अंतर्गत विश्व मंगल योग निसर्गोपचार केंद्राच्या वतीने शासकीय आयटीआय येथील विद्यार्थ्यांसाठी शास्त्रोक्त पध्दतीने सुर्यनमस्कार घेवनू प्रशिक्षण देण्यात आले.

याबाबत अधिक असे की, जळगाव शहरातील शासकीय आयटीआय येथे जागतिक सुर्यनमस्कार दिनाच्या निमित्ताने सामुहिक सुर्यनमस्कार घेण्यात आले. योग विद्या गुरुकुल अंतर्गत विश्व मंगल योग निसर्गोपचार केंद्राच्या योगशिक्षिका चित्रा महाजन आणि योग व निसर्गोपचार तज्ञ रोहन चौधरी यांनी सुर्यनमस्कारचे महत्व व सुर्यनमस्कार केल्याने शरीरावर होणारे परिणाम याबाबत मार्गदर्शन केले. यावेळी उपस्थित असलेल्या विद्यार्थ्यांना शास्त्रोक्त पध्दतीने सुर्यनमस्कार करण्याचे प्रशिक्षण देवून त्यांच्याकडून सुर्यनमस्कार करवून घेतले.

Protected Content