वृध्द महिलेची सोन्याची चैन चोरट्यांनी लांबविली

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील आकाशवाणी चौक येथून ६० वर्षीय वृद्ध महिलेच्या जवळील २६ ग्रॅम वजनाचे सोन्याची चैन अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना घडली आहे. याबाबत गुरुवार १९ जानेवारी दुपारी १ वाजता जिल्हापेठ पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जिल्हापेठ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आशाबाई रविंद्र पाटील (वय-६०, रा. कुंभारखेडा ता.जि.जळगाव) या वयोवृद्ध महिला बुधवार १८ जानेवारी रोजी दुपारी ३ वाजता आपल्या वैयक्तिक कामासाठी आकाशवाणी चौक येथे आलेल्या होत्या. त्यावेळी अज्ञात व्यक्तीने त्यांच्याजवळ असलेली सोन्याची २६ ग्रॅम वजनाची चैन हातचालाखिने त्यांच्या जवळून चोरून नेली. हा प्रकार वृद्ध महिलेच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी सोन्याची चैनचा सर्वत्र शोध घेतला. त्यांना सोन्याची चैनबद्दल काहीही माहिती न मिळाल्याने जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात धाव घेतली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून गुरुवार १९ जानेवारी रोजी दुपारी १ वाजता अज्ञात चोरट्यांवर जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास महिला पोलीस कर्मचारी वंदना राठोड करीत आहे.

 

Protected Content