मोठी बातमी : चाळीसगावात स्वतंत्र एआरटीओ कार्यालयास मंजुरी

चाळीसगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | येथे स्वतंत्र उप प्रादेशीक परिवहन कार्यालय अर्थात एआरटीओ कार्यालयास मंजुरी मिळाली असून या माध्यमातून आमदार मंगेशदादा चव्हाण यांनी वचनपूर्ती केली आहे.

आमदार मंगेश चव्हाण यांनी चाळीसगाव येथे स्वतंत्र आरटीओ कार्यालय निर्माण करण्यात यावे अशी मागणी केली होती. या संदर्भात त्यांनी पाठपुरावा केला होता. आता त्यांच्या पाठपुराव्याला यश आले असून आज या संदर्भात आमदार मंगेश चव्हाण यांच्या अधिकृत फेसबुक अकाऊंटवरून माहिती देण्यात आली आहे.

यामुळे आता जळगाव जिल्ह्यात जळगावच्या सोबतीला चाळीसगाव येथे देखील उपप्रादेशीक परिवहन कार्यालयाची निर्मिती होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. या माध्यमातून आमदार मंगेश चव्हाण यांनी पुन्हा एका आश्‍वासनाला प्रत्यक्षात साकार केल्याचे दिसून येत आहे.

Protected Content