राष्ट्रवादी कार्यकर्ता जोडो अभियानाची जिल्ह्यात लवकरच सुरुवात

 

पाचोरा, प्रतिनिधी  । जळगाव जिल्ह्यात  लवकरच राष्ट्रवादी कार्यकर्ता जोडो अभियान सुरु होणार असून या अभियानात जिल्ह्यातील खडसे समर्थकांना प्रामुख्याने पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी आवाहन केले जाणार आहे

 

पुरोगामी विचारसरणीचे नेते शेतकऱ्यांचे कैवारी शरद पवार यांचे हात बळकट करण्यासाठी माजी मंत्री व राष्ट्रवादीचे नेते एकनाथराव खडसे यांचे समर्थक सज्ज झाले आहेत. महाराष्ट्र माळी समाज महासंघाचे प्रदेशाध्यक्ष तथा ए. एम. फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष अनिल महाजन यांच्या संकल्पनेतून “कार्यकर्ता जोडो” अभियान जळगाव जिल्ह्यात लवकरच सुरु होत आहे.

 

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संघटन मजबूत करण्यासाठी “कार्यकर्ता जोडो” अभियनाची ही सुरवात केली जात आहे. एकनाथराव खडसे यांना मानणाऱ्या सर्व नवीन फळीच्या कार्यकर्त्यांना व जुन्या जानकार राजकीय लोकांना पुन्हा संघटीत व सक्रिय करून एकत्र  करण्यासाठी  नाथाभाऊ समर्थक जोडो अभियानाची सुरुवात करण्यात येत आहे.

जळगाव जिल्ह्यात दोन लोकसभा मतदारसंघ आहे. ११ विधानसभा मतदारसंघ आहे  जिल्ह्यात १५ तालुके आहेत. या सर्व तालुक्यामध्ये नाथाभाऊ खडसे यांना मानणारा गट मोठ्या प्रमाणात आहे. नवीन फळीच्या सर्व कार्यकर्त्यांना तरुणांना नाथाभाऊ खडसे यांचे कार्य व बहुजन समाजा बद्दलची एकनाथ खडसे यांची तळमळ सांगण्यासाठी खडसे समर्थक व राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष कार्यकर्ता जोडो अभियान हे सुरू करण्यात येत आहे.

एकनाथराव खडसे  यांनी चाळीस वर्षात केलेले कार्य व भारतीय जनता पार्टी  वाढवण्यासाठी घेतलेली मेहनत, भाजपा पक्ष कुठे होतो व कुठे आणला आणि पक्ष वाढल्यानंतर यांच्यावर भाजपाने कसा अन्याय केला हे सर्व आम्ही या अभियनाच्या माध्यमातून  गावोगावी खेडोपाडी फिरून नवीन पिढीच्या कार्यकर्त्यांना सांगणार आहोत असे अनिल महाजन यांनी सांगितले आहे.

पुढच्या महिन्यापासून जळगाव जिल्ह्यात या अभियानाची सुरुवात करण्यात येणार आहे व  हळूहळू महाराष्ट्रभर सर्व एकनाथ खडसे समर्थक जोडले जाणार आहेत .

Protected Content