मंदिरे दर्शनासाठी खुली करा : भाजपाची मागणी (व्हिडीओ)

पारोळा, प्रतिनिधी । राज्य शासनाने मंदिरे उघडून दैनंदिन दर्शनासाठी खुली करावी म्हणून सोशल डिस्टन्सिंगचे पालन करत भाजपतर्फे आंदोलन करण्यात आले.

पारोळ्याचे आराध्यदैवत बालाजी महाराज मंदिर समोर भाजपचे तालुका अध्यक्ष अतुल मोरे व शहराध्यक्ष मुकुंदा चौधरी व भाजपाचे ज्येष्ठ कार्यकर्ते सुरेंद्र व माजी तालुकाध्यक्ष रविंद्र पाटील, जिल्हा व शहरातील भाजपाचे कार्यकर्ते व महिला यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले.  यावेळी ठाकरे सरकारला मंदिरे न उघडल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला.

 

https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/304488844166938/

Protected Content