फैजपुर बसस्थानकावरून पार्सल सेवेला सुरूवात

फैजपूर ता. यावल (प्रतिनिधी)। कोरानाच्या प्रादुर्भावामुळे गेली पाच महिने बंद असलेली एसटी पार्सल सेवा येथील बसस्थानकातून पुन्हा पूर्ववत सुरू झाली आहे. व्यापारी व व्यावसाईक यांची पार्सल पाठवण्याची सोय झाल्यामुळे व्यापारी वर्गातून दिलासा व्यक्त केला जात आहे.

संपुर्ण महाराष्ट्रात अति जलद व खाजगी पार्सल वाहतुकीपेक्षा निम्या दरात एसटी महामंडळाकडून पार्सल पाठवण्याची व्यवस्था आहे. कोरोनोच्या प्रादुर्भावामुळे शासनाने रोगाचा प्रसार होवू नये. म्हणून राज्यातील बस सेवा व पार्सल सेवा गेली पाच महिन्यापासून बंद केली होती. त्यामुळे लघुउद्योग व व्यापारी यांची पार्सल पाठवण्यास अडचण झाली होती.

सध्या महामंडळाने जिल्ह्याबाहेर बस सेवा सुरू केल्याने पार्सल सेवा सुरू झाली आहे. त्यामुळे व्यवसाईकांना दिलासा मिळाला आहे. येथील बसस्थानकात ही सेवासुरू झाल्याचे गुणिना कमर्शिअल कंपनीच्या पासर्ल कार्यालयाचे जयेश सरोदे यांनी कळवले आहे.

व्यापारी, उद्योजक, छोटे व्यवसाईक, नागरीकआता आपल्या कौटुबिक मित्र मंडळीना लग्नसोहळा, नवरात्र, दसरा, दिवाळी अशा अनेक उत्सवावेळी पार्सल पाठवूशकतात. पार्सल सेवा अत्यंत जलद व माफक दरात उपलब्ध आहे. त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन सरोदे यांनी केले आहे.

Protected Content