सह्याद्री प्रतिष्ठानतर्फे राज्यात महारक्तदान शिबिर ; दात्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

चाळीसगाव, प्रतिनिधी । आज सह्याद्री प्रतिष्ठानच्या माध्यमातून राज्यातील विविध जिल्ह्यात सोशल डिस्टस्टींगचे पालन करत महारक्तदान शिबिर घेण्यात आले. या शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून चाळीसगाव तालुक्यातून १११ रक्त पिशव्यांचे संकलन करण्यात आले.

सह्याद्री प्रतिष्ठानातर्फे आयोजित महारक्तदान शिबिरात सोशल डिस्टस्टींगच्या सर्व सूचनांचे पालन करत आले. रक्तदात्यांनी अतिशय उस्फूर्तपणे प्रतिसाद आज दिला. यात तालुकात निहाय मिळालेला प्रतिसाद पुढील प्रमाणे तुमसर तालुका १६, शेगाव तालुका – १२, चंद्रपूर शहर – ३०, सिन्नरतालुका – ६२, खेड तालुका – ५०, चाळीसगाव तालुका – १११, संगमनेर तालुका बोटा विभाग- १०२ मनोली कोकणगाव वडगाव पान -९६ पाटण, कराड – ८९, परतूर तालुका – ५५, लातूर जिल्हा – १५५, औसा तालुका गाव लोदगा – ४२, गाव मंगरूळ – ४०, मावळ – ११२, गडहिंग्लज तालुका – १५१, जावळी तालुका – १०२, उमरगा तालुका – ५१, अकोट तालुका – ६८, माळशिरस तालुका – ११६, पंढरपूर तालुका – ८८, सांगोला तालुका- ८८, मंगळवेढा तालुका – ५६, बार्शी तालुका – १९, मोहोळ तालुका – ५८, सोलापूर शहर – २१ अशा विविध भागातून रक्तसंकलन करण्यात आले.

Protected Content