साकळी येथील आशा गटप्रवर्तक व स्वयंसेविका संपावर; विविध मागण्यांचे निवेदन

यावल प्रतिनिधी । तालुक्यातील साकळी येथील प्राथमिक आरोग्य केद्रातील आशा गटप्रवर्तक व आशा स्वंयमसेविका यांनी १६ जूनपासून काम बंद आंदोलन पुकारले आहे. विविध मागण्यांचे निवेदन तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. हेमंत बऱ्हाटे यांना देण्यात आले आहे.  

साकळी येथील प्राथमिक आरोग्य केद्रातील आशा गटप्रवर्तक व आशा वर्कर यांची महत्वाची बैठक संपन्न झाली. महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यात आशा व गटप्रवर्तक कर्मचारी संघटना कृती समितीतर्फे आशांना १८ हजार रुपये व गटप्रवर्तक अन्ना एकवीस हजार रुपये वेतन मिळावे, त्याचप्रमाणे आशा सेविकांना विमा कवच मिळावे, आरोग्यवर्धिनीचा ठरलेला मोबदला तात्काळ मिळावा त्याबरोबर शासनाने जाहीर केलेले मोबाईल व रिचार्जसाठी 300 रुपये मिळावा पगाराची स्लिप मिळावी. तालुक्यात रखडलेले आरोग्य वर्धीनी रक्कम चोख मिळावीआदी मागण्यांसाठी १५ जून पासून चाललेला कामावर बहिष्कार आंदोलनात सहभागी होण्याच्या एकमुखी निर्णय घेण्यात आला. त्यानंतर तालुका वैद्यकीय अधिकारी  डॉ. हेमन्त बऱ्हाटे यांना व नंतर साकळी  प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ.सागर पाटील यांना निवेदन सादर  करण्यात आले. त्यावेळी आशा गटप्रवर्तक व आशा स्वंयमसेविका  संघटना आयटकचे अध्यक्ष अमृत महाजन यांचा मार्गदर्शनाखाली आशा गटप्रवर्तक व आशा स्वंयमसेविकांनी काम बंद आदोलनात सहभागी झाल्या आहेत.

 

सरकारला एकजुटीचा हिसका दाखवला तरच मागण्या मंजूर होतील म्हणून संप यशस्वी करण्याचा निर्धार आशा स्वंयमसेविका यांनी केला आहे.  तालुका वैद्यकीय अधिकारी व साकळी  प्राथमिक आरोग्य केन्द्राचे वैद्यकीय अधिकारी यांना  दिलेल्या  निवेदना वर गटप्रवर्तक चित्रा फेगडे, लिना पाटील, नम्रता पाटील, अंजना महाजन, संगीता महाजन, रंजना कोळी, कल्पना सोळंके, निर्जला सोनवणे, आनिता पाटील, माया धिवर, लताबाई बडगुजर, सुनिता पाटील, जयश्री पाटील सह ३२ आशा स्वंयमसेविका यांनी काम बंद आदोलननाचे स्वाक्षरी निवेदन दिले असल्याचे प्रसिद्ध दिलेल्या पत्रकात म्हटले आहे. सादर करताना  मंजूर होईपर्यंत प्राथमिक आरोग्य केंद्रातील सर्व कामांवर बेमुदत बहिष्कार करण्याचा निर्णय सर्व अशाने स्वयंस्फूर्तीने घेतला.

Protected Content