नंदुरबार येथे विविध मागण्यांसाठी आदिवासी बांधवांचे आंदोलन

 

यावल, प्रतिनिधी । आदिवासी नागरिकांच्या विविध मागण्यासाठी शुक्रवार ५ फेब्रुवारी रोजी भारतीय ट्रायबल पार्टी व भीलीस्तान टायगर सेनेतर्फे एक दिवसीय लाक्षणिक धरणे आंदोलन करण्यात आले. दरम्यान याच मागण्यांसाठी मागील वर्षी देखील आंदोलन करण्यात आले होते, मात्र, वर्षभरात मागण्या मान्य न झाल्याने  नंदूरबार जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आदिवासी ‘तूर’ वाद्य वाजवून दुख व्यक्त करण्यात आले.  

एकात्मिक आदिवासी प्रकल्प अंतर्गत येणारे आदिवासी नागरिकांच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी भारतीय ट्राइबल पार्टी तसेच भीलीस्तान टायगर सेनेतर्फे मागीलवर्षी ५ फेब्रूवारीपासुन जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले होते. या आंदोलनात आदिवासी मुलांच्या वस्तीगृहातील डी.बी.टी. योजना बंद करून पूर्वीची खाणावळ पद्धत सुरू करावी, तसेच आश्रमशाळांसाठी लागू झालेली सेंट्रल किचन योजनेमुळे कार्यरत असलेले स्वयंपाकीन व कामाठी (कर्मचारी) बेरोजगार झाले आहेत. सेंट्रल किचन योजना बंद करून कर्मचाऱ्यांना पूर्ववत कामावर घ्यावे तसेच जिल्ह्यातील इतर अडचणींचा निपटारा लवकर करावा अशा २० मागण्या  करण्यात आल्या होत्या. 

मागील वर्षी धरणे आंदोलन जवळपास १५ दिवस चालले, त्यानंतर आदिवासी विकास मंत्री यांनी जिहाधिकारी यांच्या मार्फत आंदोलनकर्त्यांना मागण्यांबाबत सकारात्मक विचारकरून एक वर्षात सर्व समस्या सोडविण्यात येणार असल्याचे लेखी आश्वासन दिले होते. परंतु, आज त्यांच्या आश्वासनाला एक वर्ष पूर्ण होऊन देखील आंदोलनकर्त्यांच्या मागण्यांवर कोणतीही कार्यवाही झालेली नाही. 

आदिवासी समाजाच्या मागण्यांवर सकारात्मक विचार होऊन लवकरात लवकर निर्णय होईन अशी अपेक्षा होती परंतु. मागण्या पूर्ण होण्यासाठी वेळोवेळी पाठपुरावा करूनदेखील कोणतीही कार्यवाही झालेली नाही अथवा होत असताना दिसत नाही.

आदिवासी विकास मंत्री साहेब हे स्वतः आदिवासी आहेत व नंदुरबार जिल्ह्याचे जिल्हाधिकारी देखील आदिवासी समाजाचे आहेत. आणि आदिवासी समाजाच्या रास्त असलेल्या मागण्यांकडे दुर्लक्ष म्हणजे समाजासाठी मोठा धोका आहे व वरिष्ठांची समाजाप्रती असलेली वागणूक ही अत्यंत दुःखद स्वरूपाची आहे.

आज एक वर्ष उलटून गेले आहे तरी, कोणतीही कार्यवाही होत नाही म्हणून मा. आदिवासी विकास मंत्री व लेखी अस्वानसं देणारे जिल्हाधिकारी यांचे लक्ष वेधण्यासाठी आंदोलनाची वर्षपूर्ती म्हणून दि. ५ फेब्रुवारी रोजी नांदुरबार जिल्हाधिकारी कार्यलयासमोर भारतीय ट्रायबल पार्टी व आदिवासी समाजाच्या जनतेने काळ्या फिती लावून एक दिवसीय धरणे आंदोलन केले आहे.

लेखी आश्वासन देऊन आदिवासी समाजाने निवडुन दिलेल्या व्यक्तीने व आदिवासी समाजाच्या जोरावर शिक्षण घेऊन वरिष्ठ पदावर काम करणाऱ्या आदिवासी अधिकाऱ्याने समाजाची फसवणूक करणे हे समाजाच्या दृष्टीने अत्यंत खेदजनक व दुःखद आहे. म्हणून आंदोलनकर्त्यांनी काळ्या फिती तर लावल्याचं परंतु दुःख व्यक्त करण्याकरिता आदिवासी पारंपारिक दुःखाचे ‘तूर’ वाद्य वाजवून प्रशासनाचे लक्ष वेधले. आंदोलन करून जर मागण्या मान्य झाल्या नाही तर आदिवासी विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. के. सी. पाडवी यांच्या घरासमोर आदिवासी पारंपारिक दुःखाचे तूर वाद्य वाजवून तीव्र मोर्चा काढण्याचा इशारा भारतीय ट्रायबल पार्टीचे जिल्हाध्यक्ष के. टी. गावित यांनी दिला आहे. 

 

 

 

 

Protected Content