Home Cities जळगाव इंधन दरवाढीविरोधात चिंचोलीत युवा सेनेचे आंदोलन (व्हिडिओ)

इंधन दरवाढीविरोधात चिंचोलीत युवा सेनेचे आंदोलन (व्हिडिओ)

0
39


 

जळगाव प्रतिनिधी  । केंद्र सरकारने केलेल्या पेट्रोल डिझेल दरवाढीविरोधात युवा सेनेतर्फे तालुक्यातील चिंचोली येथे युवासेना जिल्हाधिकारी शिवराज पाटील यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले.

केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे पेट्रोल व डिझेल यांचे भाव गगनाला भिडले आहेत. सामान्य जनतेचे यातूनच हाल होत असून केंद्र सरकारला याचे कोणतेही प्रकारचे गांभीर्य नसल्याने या कुंभकर्णी झोपेत असलेल्या सरकारला जागे करण्यासाठी युवा सेने तर्फे आंदोलन करण्यात आले. सरकारने अवाजवी केलेली दरवाढ त्वरित मागे घ्यावी अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा युवा सेनेतर्फे देण्यात आला. 

याप्रसंगी तालुका अध्यक्ष राजू चव्हाण , शिवसेना तालुका संघटक संजय घुगे,भाऊलाल पाटील ,जितेंद्र पोळ, अतुल घुगे विजय लाड, जनार्दन पाटील, प्रवीण धुमाळ, उमेश पाटील, भगवान ठाकरे, कैलास सोनवणे, देविदास कोळी, शिवाजी मांडे, कैलास बिऱ्हाडे , अरुण पाटील आदी उपस्थित होते.

 

 

 

https://www.facebook.com/508992935887325/videos/128189622492966

 


Protected Content

Play sound