दिव्यांग कक्षास कार्यालयाची प्रतीक्षा : प्रवेशद्वाराजवळील हॉलमध्ये चालते कामकाज

यावल, लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | दिव्यांग कक्षासाठी पंचायत समितीच्या नवीन प्रशसकीय इमारतीत जागा उपलब्ध करून देण्यात यावी अशी मागणी भाजपा दिव्यांग आघाडी माजी जिल्हा अध्यक्ष अरुण पाटील यांनी केली आहे.

 

यावल पंचायत समितीत दोन वर्षापूर्वी शासनाच्या ध्येय धोरणानुसार दिव्यांग्य कक्षाची सुरु करण्यात आला आहे. यासाठी दिव्यांग कक्ष अधिकारी ही नियुक्त करण्यात आलेले आहेत. परंतु, तेव्हाही पंचायत समितीच्या जुन्या वस्तुत स्वतंत्रपणे दिव्यांग कक्ष कार्यालय नव्हते व आताही नविन भव्य वास्तुत स्थलातर झालेले आहे तरीही त्यात दिव्याग कक्ष कार्यालयास जागा उपलब्ध करून देण्यात आलेली नसल्याने इमारतीच्या प्रवेशद्वारा जवळील मोकळ्या हॉलमध्ये टेबल, खुर्ची टाकून तात्पुरते कार्यालय सुरु आहे. यात दिव्यांग बांधवाना देखील बसण्यासाठी कुठलीही आसन व्यवस्था करण्यात आलेली आहे. या गैरसोयीबाबत भाजपा दिव्यांग आघाडी माजी जिल्हाध्यक्ष अरुण पाटील यांनी खेद व्याक्त करून लवकरात लवकर दिव्यांग बांधवांसाठी प. स. च्या नविन वास्तुत स्वतंत्रपणे दिव्यांग कक्ष कार्यालयाची सुविधा मिळवून द्यावी अशीही आग्रहाची अशी मागणी जिल्हा भाजपा दिव्यांग आघाडी अरुण पाटील माजी यांनी केली आहे

Protected Content