आदीवासी विद्यार्थ्यांना निवासी इंग्रजी माध्यमीक शाळेत प्रवेशाचे आवाहन

यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव जिल्ह्यातील अनुसुचित जमातीच्या विद्यार्थ्यांना आपल्या शहरातील नामांकित इंग्रजी माध्यमातीत निवासी शाळामध्ये प्रवेश मिळवण्यासाठी राज्य शासनाची आदीवासींच्या पाल्यांसाठी २०२३-२४ या वर्षा करीता आदीवासी प्रकल्प विभागा अंतर्गत योजना असुन या योजनेचे लाभ आदीवासी बांधवांनी घ्यावे असे आवाहन आदीवासी एकात्मिक विकास प्रकल्प विभागाच्या वतीने जिल्हा आदीवासी विकास प्रकल्प अधिकारी विनिता सोनवणे यांच्या वतीने  करण्यात आले आहे.

 

राज्य शासनाच्या एकात्मिक आदीवासी प्रकल्प विभागांतर्गत जळगाव जिल्ह्यात राहणारे अनुसुचित जमातीच्या विद्यार्थ्यांसाठी सन२०२३-२४या वर्षा करीता आदीवासी समाज बांधवांच्या मुलांना शहरी भागातील नांमाकीत इंग्रजी माध्यमांच्या शाळा मध्ये प्रवेशित होणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पालकांनी आपले जात प्रमाणपत्र , लाभार्थी विद्यार्थ्याचे कुटुंब हे दारिद्रय रेषखालील असल्यास ग्रामसेवका कडुन दारिद्रय रेषेतील अनुक्रमांक केलेले पत्र , आधार कार्ड तसेच पात्र आदीवासी कुटुंबाचे वार्षीक उत्पन्न १लाख या मर्यादेत असावे , इत्तया१लीच्या इंग्रजी माध्यामीक शाळेत प्रवेश मिळवण्यासाठी विद्यार्थ्याचे वय ३१ डिसेंबर २०२३ रोजी व त्याचे वय ६ वर्ष पुर्ण असावे तर त्याचा जन्म १ जुलै २०१६ ते ३१ डिसेंबर२o१७या वर्षातील असावे , आपल्या मुलांना नामांकित प्रवेशित करण्यासाठी ईच्छुक आदिवासी पालकांनी २१ जुन ते ३१ जुन २o२३ या कालावधी वरील दिलेल्या कागदपत्रांसह यावल येथील जिल्हा एकात्मिक आदीवासी विकास प्रकल्प कार्यालयात सादर करावी असे आवाहन आदीवासी विभागाच्या जिल्हा प्रकल्प अधिकारी विनिता सोनवणे यांनी केले आहे .

Protected Content