पारोळ्यात निवडणुकीतील गैरप्रकार रोखण्यासाठी पथक सज्ज

tapasani pathak

पारोळा प्रतिनिधी । एरंडोल-पारोळा मतदारसंघात विधानसभा निवडणुकी काळात होणारे गैरव्यवहार रोखण्यासाठी शहरातील निगराणी पथक सज्ज झाले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, उमेदवारांच्या सहकार्यांकडून मतदारांना विविध प्रकारचे आमिष दाखविले जातात. जसे पैसा, मद्य आणि मासाहारी पदार्थाचे आमिश दाखवत त्यांना काळ्यापैशांचे वाटप केले जाते. विधानसभा निवडणुकी काळात असे गैरव्यवहार रोखण्यासाठी शहरातील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ वर पारोळा मार्केट कमिटीच्या समोर, बायपास अमळनेर रोडच्या परिसरात स्थायी निगराणी पथक कार्यान्वित झाले आहे. हे दोन पथक सज्ज झाले आहेत. जसे दिवसासाठी एक तपासणी पथक तर रात्रीसाठी दुसरे तपासणी पथक असणार आहे. प्रथम पथक प्रमुख राहुल मटकरी व दोन कॉन्स्टेबल त्याचप्रमाणे एक व्हिडिओ ग्राफर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. हे पथक प्रत्येक रस्ता आणि महामार्गावरील येणारी व जाणारी वाहनांची तपासणी करणार आहे.

Protected Content