आदित्य ठाकरे वरळी मतदारसंघातून लढणार

0Aaditya Thackeray 11

मुंबई (वृत्तसंस्था) युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे हे विधानसभा निवडणूक वरळी मतदारसंघातून लढणार यावर शिक्कामोर्तब झाल्याचे वृत्त आहे.

विशेष म्हणजे लोकांमधून निवडणूक आदित्य हे ठाकरे घराण्यातील पहिलेच सदस्य ठरतील.गेल्या काही महिन्यांपासून महाराष्ट्र पिंजून काढणारे आदित्य ठाकरे पहिल्यांदाच निवडणूक लढतील. आदित्य ठाकरे हेच वरळी मतदार संघाचे उमेदवार असतील अशी चर्चा सध्या सुरु आहे. वरळी मतदारसंघात शिवसेनेचे विद्यमान आमदार सुनील शिंदे यांचा सचिन अहिर यांच्या शिवसेना प्रवेशाने पत्ता कट होणार का? असे प्रश्नही उपस्थित केले गेले. मात्र वरळीत सचिन अहिर आणि सुनील शिंदे यांनी आदित्य ठाकरे यांच्या उमेदवारीसाठी शक्ती प्रदर्शन केले.

Protected Content