नगरदेवळा येथे स्वतंत्र पोलीस स्टेशन करावे; माजी आमदार वाघ यांचे गृहमंत्र्यांना निवेदन

पाचोरा प्रतिनिधी । तालुक्यातील नगरदेवळा हे मोठे गाव असून लोकसंख्याही अधिक आहे. नगरदेवळा येथे स्वतंत्र पोलीस स्टेशनची मागणी माजी आमदार दिलीप वाघ यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांना निवेदनाद्वारे केली आहे.

पाचोरा तालुक्यातील नगरदेवळा हे गाव पाचोरा शहरानंतरचे सर्वाधिक लोकसंख्येचे शहर आहे. गेल्या ४० वर्षांपासून या गावासाठी व परिसरातील इतर खेड्यांसाठी आउट पोस्ट पोलीस स्टेशन सध्या कार्यरत आहे. मात्र नगरदेवळा शहर आणि परिसरातील खेड्यांचा व्याप लक्षात घेता, तसेच नगरदेवळा गावाचे वातावरण नेहमी “हॉटस्पॉट” स्वरूपातले असल्याने या शहर वजा गावात स्वतंत्र पोलिस स्टेशनची नितांत आवश्यकता आहे. या मागणी संदर्भात यापूर्वीही अनेक वेळा तत्कालीन गृहमंत्री व मुख्यमंत्री यांचेकडे लोकप्रतिनिधींनी मागणी केली आहे. मात्र अद्याप पर्यंत ही मागणी पूर्ण झालेली नाही. पाचोरा पोलिस स्टेशनचा वाढता व्याप लक्षात घेता नगरदेवळा आउट पोस्टचे रूपांतर स्वतंत्र पोलीस स्टेशनमध्ये करण्यात यावे. अशी मागणी माजी आमदार दिलीप वाघ यांनी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांना निवेदनद्वारे केली आहे. अशी माहिती मा. आमदार दिलीप वाघ यांनी त्यांचे निवासस्थानी झालेल्या पत्रकार परिषदेत दिली. यावेळी नगरपरिषदेचे गटनेते संजय वाघ, जिल्हा प्रवक्ते खलिल देशमुख, शहर अध्यक्ष सतिष चौधरी, नगरसेवक विकास पाटील, अजझर खान, रणजीत पाटील, डिंगबर टोनपे, स्वीय्य सहाय्यक गोपी पाटील उपस्थित होते.

Protected Content