चार वर्षापासून घरकुल मंजूर; जागेसाठी लाभार्थ्याचे आमरण उपोषण (व्हिडिओ )

WhatsApp Image 2019 06 24 at 12.39.31 PM

जळगाव (प्रतिनिधी) अमळनेर तालुक्यातील निंभोरा येथील राजेंद्र गुंडू पारधी या ग्रामस्थांस सन २०१५-१६ साली पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत घरकुल मंजूर झाले असून त्यास घरकुल बांधण्यास जागा राजकीय दबावापोटी उपलब्ध करून दिली जात नसल्याचा आरोप करत घरकुलासाठी जागा मिळावी यासाठी पारधी कुटूंबाने बेमुदत आमरण उपोषणा जिल्हा परिषदेसमोर सुरु केले आहे.

सविस्तर वृत्त असे की, निंभोरा येथे राजेंद्र गुंडू पारधी यांना सन २०१५-१६ पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत घरकुल मंजूर झाले असून त्यांना घरकुल बांधण्यासाठी  राजकीय दबावापोटी जागा दिली जात नाही. गट नं. ३५० मध्ये जागा उपलब्ध आहे परंतु, वारंवार दाद मागून देखील जागा देण्यात आलेली नाही. राजेंद्र पारधी यांनी ग्रामपंचायत, पंचायत समिती, उप विभागीय अधिकारी यांच्याकडे वेळोवेळी दाद मागून देखील त्यांच्या पदरी निराशाच पडली आले. या जागेवर राजकीय पदाधिकाऱ्यांनी अतिक्रमण करून केल्याचा आरोप पारधी यांनी केला आहे. राजकीय पदाधिकारी यांच्या दबावापोटी ग्रामपंचायत कार्यकारणी जागा देत नसल्याचा आरोप पारधी यांनी केला आहे.

Protected Content