जीवन सुरक्षा विमा योजनेसाठी माजी सैनिकांनी माहिती पाठविण्याचे आवाहन

जळगाव प्रतिनिधी । राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी केलेल्या आवाहनानुसार कोरोना विषाणू महामारीच्या लढ्यात जळगाव जिल्ह्यातील माजी सैनिकांनी सुध्दा स्वेच्छेने आपला सहभाग नोंदविलेला आहे. अशा माजी सैनिकांना इतर कोरोना योध्दांप्रमाणे जीवन सुरक्षा विमा लागू करावयाचा आहे.

याकरीता या अभियानात सहभागी झालेल्या जिल्ह्यातील माजी सैनिकांनी आपले नांव, नंबर, रँक, रेजिमेंट, पत्ता, एकूण कामाचे दिवस व ठिकाण, कामाचे स्वरुप व मोबाईल क्रमांक तसेच नेमणूकीचे सक्षम अधिका-याचे पत्र इत्यादी माहिती जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, जळगाव यांचेकडे जमा करावी. असे आवाहन राहूल पाटील, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, जळगाव यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.

Protected Content