हरीविठ्ठल नगरात सट्टा जुगार खेळणाऱ्या चार जणांवर गुन्हा

जळगाव प्रतिनिधी । शहरातील हरीविठ्ठल नगरच्या रेल्वे लाईनजवळील मोकळ्या जागेवर बेकायदेशीर सट्टा खेळणाऱ्या चार जणांवर रामानंदनगर पोलीसांनी कारवाई केली असून ८ हजार ७६० रूपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

पोलीसांकडून मिळालेली माहिती अशी की, सहाय्यक पोलीस अधिक्षक कुमार चिंथा यांना मिळालेल्या गोपनिय माहितीनुसार पोउनि सुनिल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पो.कॉ. भरत बाविस्कर, किरण पाटील, शुभम बाविस्कर, रविंद्र महाजन, रमेश खोळपे, गोविंदा सुरवाडे, पोकॉ रविंद्र मोतीराया यांना हरीविठ्ठल नगरातील रेल्वे पटरीजवळ बेकायदेशीर सट्टा जुगार खेळणाऱ्यांवर आज दुपारी १२.३० वाजेच्या सुमारास कारवाई करण्यात आली. या कारवाईत निखील सुरेश पाटील (वय-३४) रा. खोटेनगर, सतिश सुरेशसिंग पाटील (वय-३८) , अफजलखान इब्राहिम खान (वय-३५) आणि ज्ञानेश्वर फुलसिंग पाटील (वय-३८) तिघे रा. खंडेराव नगर यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. त्यांच्या ताब्यातील सट्टा व जुगार  खेळण्याचे साहित्या हस्तगत केले आहे.

 

Protected Content