पिंपरखेड येथे एकाला बेदम मारहाण

चाळीसगाव- लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | तालुक्यातील पिंपरखेड येथे शुल्लक कारणावरून एकाला लाकडी काठीने जबर मारहाण केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी चाळीसगाव ग्रामीण पोलीसात चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, “शेख अलीम शेख अल्लाउद्दीन (वय-५०) रा. पिंपरखेड ता. चाळीसगाव हे वरील ठिकाणी परिवारासह वास्तव्यास आहे. शेती व्यवसाय करून ते आपल्या कुटुंबाची खळगी भरतात. दरम्यान मंगळवार, दि.३१ मे रोजी एक महिला त्यांच्या घराच्या पाठीमागे शौचासाठी आल्या. त्यावर त्यांच्या पत्नीने शौच करण्याची हि जागा आहे का? अशी विचारणा केली. यावरून सदर विवाहित महिलेने शिवीगाळ केली.

नंतर गावातील मुजाहिद्द हुसेन मुल्ला, जावेद हुसेन मुल्ला, नवाब नजीर मुल्ला व ऐतबार याकुब मुल्ला आदींनी सकाळी ८:३० वाजताच्या सुमारास अल्लाउद्दीन यांच्या घराबाहेर येऊन शिवीगाळ करायला सुरुवात केली. तेवढ्यात अल्लाउद्दीन हे घराबाहेर आले. तेव्हा मुजाहिद्द हुसेन मुल्लाने “तू आमच्या विरुद्ध पोलीसात तक्रार दाखल केली आहे. तुला बघून घेऊ.” अशी धमकी देत हातातील काठीने डाव्या हातावर मारहाण करून दुखापत केली. तेव्हा लागलीच जावेद हुसेन मुल्ला पाठीमागून येवून पाठीवर काठीने मारहाण केली.

यावेळी मुलगा अरबाज फैजल याने वाद मिटविण्याचा प्रयत्न केला. त्यालाही मारहाण करण्यात आली. त्याचवेळी आम्हाला पटेल त्याठिकाणी “शौचवरून यापुढे काही बोलाल तर जिवंत सोडणार नाही.” अशी धमकी ऐतबार याकुब मुल्ला यांनी दिली. दरम्यान या वादात अल्लाउद्दीन यांना दुखापत झाल्याने त्यांना चाळीसगाव येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. या याप्रकरणी शेख अलीम शेख अल्लाउद्दीन यांच्या फिर्यादीवरून वरील चार जणांविरुद्ध चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या निर्देशानुसार सुरू आहे.

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!