वेळेवर उपचार मिळाल्याने कामगार महिलेला केले रुग्णालयात दाखल

जळगाव प्रतिनिधी । दोन पैसे कमवण्यासाठी जळगावात आलेले भिल्ल समाजाचे कुटुंबातील कामगार महिलेला नववा महिना सुरू असून मंगळवारी संध्याकाळी अचानक पोट दुखू लागते. उपस्थित कुटुंबाची चांगलीच धावपळ सुरू झाली. सुदैवाने शासकीय रुग्णालयाजवळच काम सुरू असल्याने महिलेला तत्काळ दाखल करण्यात आले. यासाठी जनसंपर्क कक्षाचे मोठे सहकार्य त्यांना लाभले. 

मध्यप्रदेशातील बालवाशा गावचे  रहिवासी असलेले भिल्ल समाजाचे कुटुंब महापालिकेच्या ठेकेदाराकडे काही दिवसांपासून काम करीत आहे.  रस्त्यांच्यामध्ये भुयारी गटारी तयार करणे तसेच संबंधित काम हे कुटुंब आणि त्यांच्या गावचे मंडळी करीत आहे. दोन दिवसांपासून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या दोन्ही प्रवेशद्वाराच्या समोर महापालिकेच्या ठेकेदाराच्या वतीने भुयारी गटारीचे काम सुरू झाले आहे. मंगळवारी २९  रोजी काम सुरु असताना परिवारातील कालुबाई काळू बालवाशा या २५ वर्षीय विवाहित महिलेच्या पोटात त्रास होऊ लागल्याने त्यांच्या कुटुंबाने समोरच्या सरकारी रुग्णालयात आणले.

महिलेला दाखल करायचे म्हणून महिलेचा भाऊ जुम्मन, दिर व कुटुंबातील महिला सदस्य  रुग्णालयाच्या आवारातील जनसंपर्क कक्षात आले. तेथे जनसंपर्क सहाय्यक विश्वजीत चौधरी यांनी त्यांची विचारपूस केली. त्यांना त्यांचे नाव, गाव व इतर  माहिती व्यवस्थित सांगता येईना. त्यांना केस पेपर व ऍडमिशन फॉर्म काढून देत स्त्रीरोग व प्रसूतीशास्त्र कक्ष (क्र.६) येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले.

मध्य प्रदेशातील असल्यामुळे आणि जळगावातील माहिती नसल्याने महिलेच्या कुटुंबांना रक्ताचे व इतर अहवाल काढण्यासाठी मदत करण्यात आली. तसेच कक्ष सेवकांच्या मदतीने सोनोग्राफी केंद्र व इतर विभागांमध्ये महिलेला घेऊन पूर्ण तपासण्या करीत योग्य उपचार करण्यात आले. यासाठी परिचारिका सुषमा धनगर, ए.ए.कानडे यांच्यासह तज्ञ डॉक्टर,  परिचारिका यांचे सहकार्य ह्या भिल  समाजाच्या परिवाराला व महिलेला लाभले. वेळेवर व मोफत उपचार मिळाल्याने महिलेचे प्राण वाचले. महिलेचे माहेर राजस्थान येथील असून सासर बलवशा, मध्यप्रदेश येथील आहे. महिलेला दाखल करण्यात आले असून पुढील उपचार सुरू आहेत.

जनसंपर्क कक्षाद्वारे उत्तम कार्य 

येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय हे नॉन कोविड म्हणून सुरू करण्याचे त्या वेळेला जे नियोजन करण्यात आले होते त्याचाच एक भाग म्हणून दर्शनी भागातील जनसंपर्क कक्षाकडे आम्ही पाहिले होते. वरील घटनेमुळे जनतेला पुन्हा एकदा जनसंपर्क कक्षाचा फायदा झाल्याचे दिसून येत आहे. आजवर अनेक रुग्णांना, नातेवाईकांना जनसंपर्क कक्षाचा चांगला फायदा झाला आहे. जनसेवा हीच ईश्वरसेवा हे आमचे ब्रीदवाक्य आहे.

 

 

 

Protected Content