गुरुवर्य प.वि. पाटील विद्यालयात अष्टविनायक कथाकथन उपक्रम

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । केसीई सोसा. संचालित गुरुवर्य प. वि. पाटील विद्यालयात गणेशोत्सवानिमित्त अष्टविनायक कथाकथन उपक्रम लुल्हे सर व शाळेच्या मुख्या रेखा पाटील यांच्या प्रेरणेने राबविण्यात आला.

लो टिळकांनी सुरु केलेल्या गणेशोत्सवाची वैशिष्ट्ये सांगून पर्यावरणपुरक गणेशाची स्थापना करा व प्रदूषण टाळा असे आवाहन विद्यार्थ्यांना करण्यात आले. परिपाठाच्या वेळात प्रत्येक वर्गशिक्षकाने आपल्या वर्गात वक्रतुण्ड ‘ एकदन्त ‘ महोदर, गजानन लम्बोदर ‘ विकट, विघ्नराज, धूम्रवर्ण या कथा विद्यार्थ्यांना सांगितल्या.

दि ७ सप्टेबर 2022 बुधवार रोजी गणेशप्रिय २१ वनौषधीचे उपयोग सांगून गणेशाचे चित्र असलेली रंगभरण स्पर्धा शाळेतील सर्व विद्यार्थ्यांची घेण्यात आली आणि अष्टविनायक कथाकथन उपक्रमाचा समारोप करण्यात आला सर्वांनी गणेशस्तवन व आरतीचे समूहगायन केले

दूर्वा आघाडा केवडा शमी कमळ रुई लाल जास्वंद अशा गणपतीला प्रिय असणा-या वनस्पतींची माहिती शिक्षकांनी विद्यार्थ्यांना दिली यासाठी सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे सहकार्य मिळाले व सर्वांनी आनदाने व जल्लोषात गणपती बाप्पाला निरोप दिला .

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

Protected Content