महापौर-उपमहापौरांनी घेतली खा. संजय राऊत यांची भेट

मुंबई प्रतिनिधी । महापौर जयश्री महाजन व उपमहापौर कुलभूषण पाटील यांनी आज शिवसेनेचे मुख्य प्रवक्ते तथा खासदार संजय राऊत यांची भेट घेऊन त्यांना जळगावला येण्याचे आमंत्रण दिले.

 

याबाबत वृत्त असे की, महापौर सौ. जयश्री सुनील महाजन आणि उपमहापौर कुलभूषण पाटील हे सध्या मुंबईत असून लवकरच भाजपमधील नगरसेवकांचा एक गट शिवसेनेत दाखल होणार आहे. कालच महापौर आणि उपमहापौर यांनी नगरविकास मंत्री ना. एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती. यानंतर आज त्यांनी शिवसेनेचे मुख्य प्रवक्ते तथा राज्यसभेचे खासदार संजय राऊत यांची भेट घेतली. या भेटीत जळगावातील विकासाबाबत चर्चा झाली. तसेच खासदार राऊत यांना जळगाव भेटीचे निमंत्रण देखील देण्यात आले.

 

याप्रसंगी जळगावचे संपर्क प्रमुख संजय सावंत आणि रावेरचे संपर्क प्रमुख विलास पारकर, माजी उपमहापौर सुनील महाजन यांची उपस्थिती होती.

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.