मध्यरात्री तरूणाची दुचाकी पेटविली; एकावर गुन्हा दाखल !

अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । अमळनेर शहरातील कासार गल्लीतील भोई वाडा येथे तरूणाची दुचाकी पेटवून दिल्याचा खळबळजनक घटना शनिवारी ३० मार्च रोजी मध्यरात्री अडीच वाजेच्या सुमारास उघडकीला आले आहे. याप्रकरणी दुपारी २ वाजता एकावर अमळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक असे की, कासार गल्लीतील भोई वाडा येथे महेद्र भटु महाजन वय ३६ हा तरूण आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. महेंद्र याने त्याची दुचाकी क्रमांक (एमएच १९ डीके २०६६) ही त्यांच्या घराच्या अंगणात शुक्रवारी २९ मार्च रोजी रात्री १० वाजता पार्कींगला लावलेली होती. दरम्यान संशयित आरोपी बंटी बाळकृष्ण महाजन रा. संताजी चौक, अमळनेर याने घरासमोर लावलेली दुचाकी पेटवून दिली. शनिवारी ३० मार्च रोजी मध्यरात्री अडीच वाजेच्या सुमारास दुचाकी पेटविल्याचे लक्षात आल्यांनतर महेंद्र महाजन यांनी बाहेर जावून पाहिले असता दुचाकी जळतांना दिसून आली.

दुचाकीजवळ बंटी महाजन हा उभा असतांना दिसून आला. त्यावर त्याला महेंद्र यांनी दुचाकी पेटवून दिल्याचा जाब विचारला परंतू बंटी महाजन याने काहीही उत्तर न देता घटनास्थळाहून पसार झाला. यावेळी दुचाकी विझविण्यात आली परंतू यात आगीत दुचाकी जळून खाक झाली. याप्रकरणी महेंद्र महाजन यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार दुपारी २ वाजता संशयित आरोपी बंटी महाजन याच्या विरोधात अमळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ चंद्रकांत पाटील हे करीत आहे.

Protected Content