सेवानिवृत्त शासकीय अधिकाऱ्याच्या घरातून रोकडची चोरी

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील गणपती नगरातील सेवानिवृत्त शासकीय अधिकाऱ्याच्या घरातून एका महिलेने कपाटातन २१ हजारांची रोकड लांबविल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी रविवारी २३ जुलै रोजी सायंकाळी ६ वाजता एका महिलेवर रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

पोलीस सुत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, जळगाव शहरातील गणपती नगरात सेवानिवृत्त शासकीय अधिकारी अनिल कृष्णराज गुजर (वय-६२) हे आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. २६ जानेवारी ते २८ जानेवारी दरम्यान त्यांच्या घरातील कपाटातून मनिषा उर्फ शोभा सुनिल सोनवणे रा. मेहरूण, जळगाव या महिलेने २१ हजारांची रोकड चोरून नेली. तपासानंतर सहा महिन्यांनी हा प्रकार उघडकीला आला. याप्रकरणी सेवानिवृत्त शासकीय अधिकारी गुजर यांनी रविवारी २३ जुलै रोजी रामानंदनगर पोलीस ठाण्यात धाव घेवून महिलेविरोधात तक्रार दिली. त्यानुसार रामानंदनगर पोलीस ठाण्यात संशयित आरोपी महिला मनिषा उर्फ शोभा सुनिल सोनवणे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक रेवानंद साळुंखे करीत आहे.

Protected Content