आयपीएल सामन्यामुळे वाद; एकाचा मारहाणीत मृत्यू

कोल्हापूर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | देशातील क्रिकेट प्रेमीना धक्का देणारी घटना कोल्हापूर येथे घडली होती. देशात सध्या आयपीएलची रणधुमाळी सुरू आहे. आयपीएल मध्ये अनेक संघ खेळतात आणि त्यात प्रत्येक क्रिकेटप्रेमीचे वेगवेगळे खेळाडू चाहते असतात. काही जण विराट कोहली रॉयल चॅलेजर्स बंगळूरूला समर्थन करतात, काही जण रोहित शर्माच्या मुंबई इंडियन्सचे समर्थन करतात तर काही जण महेंद्रसिंह धोनीच्या चैन्नईचे समर्थन करतात. रोहित शर्माला मुंबईच्या कर्णधारपदावरून काढून टाकण्यात आले होते, त्यामुळे त्याचे चाहते नाराज होते. परंतू आता कोल्हापूरमध्ये मोठी खळबळजनक घटना या मुंबई इंडियन्सच्या सामान्यामुळे घडली आहे.

या संदर्भातील सविस्तर वृत्त असे की, कोल्हापूर जिल्हयातील करवीर तालुक्यात हणमंतवाडी येथील २७ मार्च रोजी रात्री दहा वाजता बंडू तिबिले, सागर झांजगे व बळवंत झांजगे हे आयपीएलचा सामना बघत होते. हा सामना मुंबई इंडियन्स विरूध्द चेन्नई सुपर किंग्स असा सुरू होता. त्यावेळी रोहित शर्मा बाद झाला. बंडूपत तिबिले यांने यावेळी त्याचा आनंद साजरा केला. त्याचा राग सागर झांजगे आणि बळवंत झांजगे यांना आल्याने त्यांनी बंडूपत तिबिले याला दांडक्याने जबर मारहाण केली. त्यानंतर त्याच्या कानातून आणि नाकातून रक्तत्राव थांबत नव्हता. यादरम्यान गंभीर जखमी अवस्थेत त्याला रूग्णालयात दाखल करण्यात आले. परंतू उपचारादरम्यान तीन दिवसानंतर त्याचा मृत्यू झाला. बंडूपत तिबिले यांच्यामागे पत्नी, तीन मुली, जावई, मुलगा, नातवंडे, भाऊ-बहीण असा मोठा परिवार आहे. या प्रकरणातील संशयित आरोपी आरोपी सागर झांजगे व बळवंत झांजगे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी त्यांना अटक केली आहे.

Protected Content