दुचाकी मागितल्याच्या रागातून तरूणाला लोखंडी सळईने मारहाण

अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । तालुक्यातील कलाली गावात राहणाऱ्या ३० वर्षीय तरुणाला दुचाकी मागितल्याच्या रागावरून एकाने बेदम मारहाण करून लोखंडी सळई डोक्यात टाकेल्याने गंभीर दुखापत केल्याची घटना घडली होती. याप्रकारणी मारवड पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, मच्छिंद्र आधार कोळी वय-३०, रा.कलाली ता.अमळनेर हा तरुण आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. दरम्यान गावातील समाज मंदिर ओट्याजवळ मच्छिंद्र कोळी याने दुचाकी मागितल्याचा राग आल्याने गावात राहणारा विनोद उर्फ पिंग्या भगवान भिल याने मच्छिंद्र कोळी याला चापटाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. तसेच हातातील लोखंडी सळई घेऊन डोक्याला मारहाण केल्याने गंभीर दुखापत केल्याची घटना गुरुवार २८ मार्च रोजी सायंकाळी ७ वाजता घडली. याप्रकरणी मच्छिंद्र कोळी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शुक्रवार २९ मार्च रोजी दुपारी ४ वाजता संशयित आरोपी विनोद उर्फ पिंग्या भगवान भिल याच्या विरोधात मारवाड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पुढील तपास पोहेकॉ संजय पाटील हे करीत आहे.

Protected Content