पतंजलीच्या अडचणीत वाढ ; अमेरिकेकडून उत्पादनात गडबडीचा आरोप

Ramdev 860x508

 

जळगाव (प्रतिनिधी) रामदेव बाबांच्या पतंजली कंपनी अडचणीत सापडली आहे. अमेरिकेच्या खाद्य विभागाने पतंजलीवर चुकीचे उत्पादन विकत असल्याचा गंभीर आरोप लावला आहे. पतंजलीवरील आरोपात तथ्य आढळल्यास कंपनीला तीन कोटीचा दंड ठोठावला जाऊ शकतो.

 

या संदर्भात ‘बोलता हिंदुस्तान’ या वेबसाईटने वृत्त प्रकाशित केले आहे. या वृत्तात म्हटले आहे की, अमेरिकेच्या खाद्य नियम युनाईटेड स्टेट्स फूड अॅन्ड ड्रग अड्मीनीस्ट्रेशन (USFDA) ने जाहीर केलेल्या अहवालनुसार पतंजली आयुर्वेद कंपनी दोन सरबत ब्रांड बाबत वेगवेगळे दावे केले आहेत. अमेरिका खाद्य विभागाने आपल्या अहवालात म्हटले आहे की, पतंजली भारतात विकणाऱ्या सरबतच्या उत्पादन लेबलवर वेगळे दावे केले आहेत. तर अमेरिकेत निर्यात करणाऱ्या सरबतवर वेगळे दावे आहेत. तसेच पतंजली भारत आणि अमेरिका या दोन्ही देशांसाठी वेगवेगळ्या पद्धतीने उत्पादन आणि पॅकेजिंग करते.

 

या अहवालात हे देखील म्हटले आहे की, पतंजली हरिद्वारच्या प्लांटच्या ज्या विभागात मध बनविले जाते. त्याठिकाणी उत्पादन मशिनरीच्या वर कबुतर उडत होते. अर्थात पतंजलीने यावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाहीय. तंजलीविरुद्ध लावण्यात आलेले आरोपांमध्ये तथ्य आढळून आल्यास कंपनीविरुद्ध फौजदारी स्वरूपाचा खटला आणि तीन करोडपर्यंतचा दंड ठोठावला जाऊ शकतो. एवढेच नव्हे तर, कंपनीच्या अधिकाऱ्यांना तीन वर्षाची शिक्षा देखील होऊ शकते.

Protected Content