किरण चहा दुकान फोडून १५ हजारांची रोकड लांबविली

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील नवीपेठ येथील किरण चहाचे दुकानाचे मागच्या बाजूचे शटर उचकावून आत प्रवेश करत दुकानाच्या गल्ल्यातून १४ हजार ९०० रूपयांची रोकड लांबविल्याची घटना उघडकीला आली आहे. या संदर्भात सायंकाळी ७ वाजता जळगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, गिरीश साजनदास चुगरा वय ४९ रा. नेहरू नगर, जळगाव हे आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. त्यांचे नवीपेठेत किरणच्या नावाचे होलसेल दुकान आहे. नवीपेठ येथील किरण चहाचे दुकान आहे. शनिवारी २४ फेब्रुवारी रोजी पहाटे ४ वाजता दुकानाचे मागचे शटर उचकावून आत प्रवेश करत दुकानाच्या गल्ल्यातून १४ हजार ९०० रूपयांची रोकड चोरून नेल्याची घटना उघडकीला आली आहे. याप्रकरणी सायंकाळी ७ वाजता जळगाव शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Protected Content