गोरेगाव फिल्मसिटीत भिंत कोसळून दोन कामगार जागीच ठार, तर एक जखमी

मुंबई-लाईव्ह ट्रेंड्स न्युज वृत्तसेवा । मुंबई येथील गोरेगावातील फिल्मसिटीजवळ उंच भिंत कोसळल्याची दुर्घटना घडली आहे. ही दुर्घटना २४ फेब्रुवारी रोजी संध्याकाळी घडली. या दुर्घटनेत दोन जणांचा मृत्यू झाला. तर एक जण जखमी झाला आहे. घटनेनंतर बराच वेळ मदत आणि बचावाचे कार्य सुरू होते. या घटनेबद्दल कळताच अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी मदतकार्य केले. फिल्मसिटी गेट नंबर 2 जवळ 60 फूट लांब आणि 20 फूट उंच भिंत कोसळली. या भागात बांधकाम सुरू होते. सुरक्षेसाठी रात्री उशिरापर्यंत ढिगारा काढण्याचे काम सुरू होते.

भिंत कोसळली असता दुर्घटनेत दोन बांधकामगाराचा जागीच मृत्यू झाला तर एक बांधकामगार जखमी झालेला आहे. या जखमी बांधकामगाराला जोगेश्वरी येथील इस्पिताळात उपचारासाठी दाखल केले आहे. या दुर्घटनेची माहिती मिळताच पोलिस आणि अग्निशमन दलाची टीम घटनास्थळावर दाखल झाली आणि बचावकार्य सुरू केले. त्यांनी कोसळलेल्या भिंतीच्या ढिगाऱ्यातून तीनही बांधकामगारानां बाहेर काढले. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सिंतू मंडल (वय वर्ष – ३२) आणि जयदेव बिसवास (वय वर्ष – ४५) या बांधकामगाराचा जागीच मृत्यू झाल्याचे बचावकर्मींयाच्या लक्षात आले. विक्रम मंडल हे कामगार किरकोळ जखमी झाला आहे. तीनही बांधकामगार मजूरीचे काम करत होते.

Protected Content