जळगावात रस्त्याच्या कामांचे आ.राजूमामा भोळे यांच्याहस्ते भूमीपूजन

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील पिंप्राळा शिवार परिसरात, निमखेडी परिसर आणि आव्हाणे शिवारात विविध विकास कामांचे भूमीपूजन आमदार राजूमामा भोळे यांच्याहस्ते रविवारी २५ फेब्रुवारी रोजी दुपारी १२ ते २ वाजेच्या दरम्यान करण्यात आले. याप्रसंगी परिसरातील नागरीक व स्थानिक रहिवाशी यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

याबाबत अधिक माहिती अशी की, जळगाव शहर महापालिकेतील मूलभूत सुविधांच्या अंतर्गत प्रभाग क्र‌मांक ८ व १० पिंप्राळा परिसर व निमखेडी परिसरातील सायली मेडिकल चाळीस खोल्या ते श्रीराम मंदिरापर्यंत चा रस्ता, सोनी बंगला ते म्हाड कॉलनी परिसरातील रस्ता, हायवे दर्शन कॉलनीतील रस्ता, भिकमचंद जैन नगर ते चौधरी प्रोव्हिजन ते श्री जोशी हाऊसपर्यंतचा रस्ता, भिकमचंद जैन नगर ते हुरसंत जोगी यांच्या घरापर्यंत रस्ता, आव्हाने शिवारातील श्रीकृष्ण कॉलनी येथील रस्त्याच्या कामांचे भूमीपूजन करण्यात आले.

तसेच द्वारका नगर मधे सिमेंट गटारी बांधकाम करण्यात येत आहे, गुजरात पेट्रोल पंप पासून जुना हायवे रोड, खोटे नगर पोलीस लाईन मधील रस्ता, निमखेडी गावठाण येथील रस्ता, कचरा फॅक्टरी ते सद्गुरु बैठक हॉल पर्यंत खडीकरण व काँक्रीटीकरण करण्यात येत आहे. या सर्व कामांचे भूमिपूजन सोहळा जळगाव शहराचे आमदार राजूमामा भोळे यांच्याहस्ते करण्यात आले.

याप्रसंगी माजी ज्येष्ठ नगरसेवक आबा कापसे, माजी नगरसेवक सौ शोभाताई बारी, डॉ चंद्रशेखर पाटील, मनोज चौधरी, विजय पाटील, सुरेश सोनवणे, समाजसेवक अतुल बारी यांच्यासह परिसरातील नागरिक उपस्थित होते.

Protected Content