समाजकल्याण विभागाच्या अठरा कोटींच्या कामांना प्रशासकीय मान्यता

जळगाव प्रतिनिधी । जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागांतर्गत विविध ४३२ कामांसाठी १८ कोटी २४ लाख ६० हजार ५०० रुपयांच्या खर्चास समाजकल्याण समितीच्या बैठकीत प्रशासकीय मान्यता देण्यात आली.

समाजकल्याण खात्याच्या झालेल्या बैठकीच्या अध्यक्षस्थानी सभापती जयपाल बोदडे होते. तर याप्रसंगी सदस्य नंदकिशोर महाजन, प्रभाकर सोनवणे, नीलेश पाटील, भानुदास गुरचळ, वनिता गवळे, नंदा पाटील, मनीषा पाटील यांची उपस्थिती होती. याप्रसंगी सव्वा अठरा कोटींच्या कामांना मंजुरी देण्यात आली यात पाण्याची टाकी, पाइपलाइन, शौचालय, गटारी, काँक्रिटीकरण, भूमिगत गटारी, पोट रस्ते, अंतर्गत रस्ते, नवीन समाजमंदिर बांधणे या ४३२ कामांचा समावेश आहे.

Protected Content