कुलर फॅक्टरीतून चार कुलर व गॅस सिंलेडरची चोरी करणाऱ्या तिघांना अटक

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । तालुक्यातील कुसुंबा शिवारातील विशाल कुलर फॅक्टरीमधून चार कुलर आणि एक गॅस सिलेंडर लांबविणाऱ्या तिघांना एमआयडीसी पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. त्यांच्याजवळून चोरीला गेलेला मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केले असून आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, अयोध्या नगरातील विशाल ढवळे यांची कुसुंबा शिवारात विशाल कुलर नावाची फॅक्टरी आहे. गुरूवारी १३ एप्रिल रोजी रात्री अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या फॅक्टरीमधून चार कुलर आणि एक गॅस सिलेंडर चोरून नेले होते. एवढेच नव्हे तर फॅक्टरीमध्ये लावलेले दोन कॅमेरे तोडून नुकसान केले होते. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसात गुन्ह्याची नोंद करण्यात आली होती.

गुन्हा दाखल झाल्यानंतर एमआयडीसी पोलीसांनी तपासाचे चक्रे फिरविली. या चोरीच्या गुन्ह्यामध्ये धनराज अवदेश पासवान (१९), विपुल प्रकाश पाटील (२२), निखील उत्तम धनगर (१९, सर्व रा. कुसुंबा ता. जळगाव) यांचा समावेश असल्याची गोपनिय माहिती पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांना मिळाली होती. तिघांना एमआयडीसी परिसरातून अटक केली आहे. त्यांच्याकडून चोरीस गेलेले १४ हजार रुपये किंमतीचे चार कुलर व दीड हजार रूपये किंमतीचे गॅस सिलेंडर असा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. ही कारवाई सहाय्यक फौजदार अतुल वंजारी, रामकृष्ण पाटील, किशोर पाटील, विशाल कोळी, चंद्रकांत पाटील, सचिन पाटील आदींनी केली आहे.

Protected Content