विजेच्या धक्क्याने मजूराचा जागीच मृत्यू

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगावातील सुप्रिम कॉलनीजवळील एका कंपनीत कामाला असलेल्या मजूराला विजेच्या धक्क्याने जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या घटनेबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

प्रकाश मजन बारेला (वय-२२) रा. किनगाव ता. यावल ह.मु. सुप्रिम कॉलनी, जळगाव असे मृत तरूणाचे नाव आहे. याबबात अधिक माहिती अशी की, प्रकार बारेला हा पत्नी व लहान भाऊ यांच्या सोबत सुप्रिम कॉलनीत गेल्या महिन्याभरापासून वास्तव्याला होता. सुप्रिम कॉलनी जवळील प्लॉस्टिक रिसायकलींग करण्याच्या कंपनीत कामाला होता. त्याच कंपनीत त्याचा लहान भाऊ अनिल हा देखील कामाला आहे. नेहमीप्रमाणे बुधवारी १९ एप्रिल रोजी प्रकाश बारेला हा कामावर असतांना दुपारी ३ वाजता कंपनीत कामाला असतांना रिसायकलींग करणारे मशीन चालू करण्यासाठी गेला असता त्याला विजेचा जोरदार धक्का बसला. यात प्रकाशचा जागीच मृत्यू झाला. त्याला इतर सहकाऱ्यांनी तातडीने उचलून जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी यांनी मयत घोषीत केले. गेल्या तीन महिन्यापुर्वीच त्याचे लग्न झाले होते. कामाच्या निमित्ताने गेल्या महिन्याभरापासून पत्नी व लहान भावासोबत आला होता. या घटनेमुळे बारेला कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. मयताच्या पश्चात वडील, पत्नी काजल, दोन भाऊ अनिल आणि बाळू असा परिवार आहे. या घटनेबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस नाईक किरण पाटील आणि पोकॉ ढवळे करीत आहे.

Protected Content