बसला उशीर ; वाहक निरीक्षकाचे विद्यार्थ्यांना उडवाउडवीचे उत्तर

7011bc72 0b34 4477 b9b7 1b47787e26bb

जळगाव, प्रतिनिधी | येथील बस स्थानकात बाबुळगाव ते जळगाव या बसची निर्धरीत वेळ सायंकाळी ७ वाजेची आहे. परंतु, ही बस उशिराने धावत आहे. विद्यार्थी व प्रवाशांनी याबाबत विचारणा केली असता त्यांना उडवाउडवीचे उत्तरे देण्यात आली.

 

बाबूळगाव ते जळगाव बसला निर्धारित वेळेपेक्षा उशिर का लागत आहे याची प्रवासी व विद्यार्थी यांनी वाहक निरीक्षकाला विचारणा केली. त्यावेळी त्यांनी उडवाउडवीची उत्तर विद्यार्थ्यांना दिली. ही बस सकाळी उशिरा होती. दररोज उशिरा येते. तुम्ही विचारपूस करत नाहीत का ? असा संतप्त सवाल विद्यार्थ्यांकडून केला जात होता. अद्यापही ती बस लागलेली नाही बस आल्यावर जाईल असे त्यांनी सांगितले.

Protected Content