वरखेडे-लोंढे राज्यात सर्वात कमी कालावधीत पूर्ण होणारा ऐतिहासिक प्रकल्प ठरणार

WhatsApp Image 2019 08 09 at 7.08.22 PM

चाळीसगाव, प्रतिनिधी | अनेक वैशिष्टे असलेल्या व प्रगतीपथावर असलेल्या वरखेडे लोंढे बँरेजचे काम राज्यात सर्वाधिक कमी कालावधीत पूर्ण होणारा ऐतिहासिक प्रकल्प ठरणार आहे.आज येथील कामकाजाची प्रगती व आढावा घेण्यासाठी खासदार उन्मेष पाटील यांनी भेट दिली.

 

सुमारे साडे पस्तीस दशलक्षघनमीटर पाण्याची साठवण क्षमता असलेला चाळीसगाव तालुक्यातील २२ गावे व भडगाव तालुक्यातील ११ गावांना पिण्याच्या पाण्याचा तसेच या क्षेत्रातील ७ हजार ५४२ हेक्टर जमिनीला जलसिंचनाचा फायदा देणारे आधुनिक पद्धतीने साकारले जाणारे वरखेडे लोंढे बँरेज प्रकल्पावर एक टेलीबेल्ट , तीन क्रेन, दोन ब्ले चींग मशिन प्लांट या अत्यंत आधुनिक मशीनच्या साह्याने उर्वरित कॉंक्रिटीकरण रात्रंदिवस सुरू असून हा प्रकल्प वेळेत पूर्ण होणार आहे.राज्यात शंभर टक्के निधी उपलब्ध असलेला व अवघ्या एका वर्षात पूर्ण होणारा, तळाला १८ मिटर वाळू मुळे काम करणे शक्य नसतांना समुद्रात वापरले जाणारे शिट फाईल तंत्रद्यानाचा होणारा वापर करण्यात येत आहे. मोठ्या प्रमाणात वापरले जाणारे मनुष्यबळ तंत्रज्ञ , ४ हजार मेट्रिक टन वजनाच्या लोखंडी वक्राकार दरवाजे अशा अनेक वैशिष्टे असलेल्या या प्रगतीपथावर असलेल्या वरखेडे लोंढे बँरेजचे काम राज्यात सर्वाधिक कमी कालावधीत पूर्ण होणारा ऐतिहासिक प्रकल्प ठरणार आहे.आज येथील कामकाजाची प्रगती व आढावा घेण्यासाठी खासदार उन्मेष पाटील यांनी भेट दिली. यावेळी तापी पाटबंधारे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक तथा मुख्य अभियंता एच. डी. कुलकर्णी, अधीक्षक अभियंता आनंद मोरे ,कार्यकारी अभियंता प्रशांत मोरे, प्रकल्पाचे ठेकेदारांचे तांत्रिक सल्लागार पी. आर. पाटील ,सहाय्यक कार्यकारी अभियंता सचिन पाटील, पंचायत समितीचे उपसभापती संजय पाटील, माजी सदस्य दिनेश बोरसे, आत्मा कमेटी अध्यक्ष रवींद्र चौधरी, जिल्हा परिषद सदस्य भाऊसाहेब जाधव, जिप सदस्य अनिल गायकवाड , युवा मोर्चाचे कपिल पाटील, अॅड. राजेंद्र सोनवणे , नरेंद्रकाका जैन, शिवदास महाजन ,पंचायत समिती सदस्य सुनील पाटील, रविआबा जामदेकर, उदय पवार, भाजपा सरचिटणीस अमोल नानकर , शरद पाटील यांच्यासह पदाधिकारी, अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.

केंद्र शासनाच्या बळीराजा कृषी संजीवनी योजनेत समाविष्ठ होण्यासाठी केंद्रीय जल आयोगाच्या वडोदरा कार्यालयात प्रस्ताव सादर करण्यात येऊन त्यास मंजुरी मिळून ४०५ कोटी इतका भरीव निधी प्राप्त झाला आहे. उपखेड, वरखेड, सेवानगर पिलखोड, तामसवाडी या गावांना पिण्याचे पाणी व शेतीसाठी पाणी मुबलक प्रमाणात उपलब्ध होणार आहे. चाळीसगाव व भडगाव तालुक्यातील २५ हुन अधिक गावांना त्याचा फायदा होणार आहे. या सर्व कामांचा पाठपुरावा खासदार उन्मेष पाटील यांनी वेळोवेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या कडे केल्याने हा प्रकल्प लवकरच पूर्ण होणार आहे अशी माहिती प्रसार माध्यमांशी बोलताना प्रकल्पाचे तांत्रिक सल्लागार अभियंता प्रकाश पाटील यांनी दिली.दरम्यान, वरखेडे लोंढे बँरेज प्रकल्पाच्या कामास गती मिळाली असल्याने जलसिंचन क्रांतीला खऱ्या अर्थाने सुरुवात होणार आहे. या प्रगतीपथावरील कामास विविध विद्यापीठांमधील अभियांत्रिकी विभागातील विद्यार्थी विद्यार्थिनी यांनी भेट देण्यासाठी येत आहे. आजपर्यंत अमृत वाहिनी पुणे, श्रम साधना ट्रस्टचे पोलिटेक्निक कॉलेज बांभोरी जळगाव सजीवनी पॉलिटेक्निक कॉलेज पुणे,यांच्यासह राज्यातील विविध विद्यापीठांमधील अभियांत्रिकी विद्यार्थ्यांच्या पथके दहा दिवस येथे जाऊन कामकाजाची अवलोकन करीत आहे. या ठिकाणी आधुनिक मशीनरीद्वारे सुरु असलेली काम पाहण्यासाठी तालुक्यातील व परिसरातील अनेक नागरिक आपल्या परिवारास या कार्यस्थळावर भेट देत आहेत. तालुक्याच्या परिसरातील शेकडो नागरिक, तरुण या कार्यस्थळी दररोज या अभियांत्रिकी अविष्काराचे साक्षीदार होण्यासाठी भेट देत आहे.

वरखेडे लोंढे बँरेज वर्ष अखेर पूर्ण होणार

वरखेडे लोंढे बँरेज पूर्ण करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्याकडे वेळोवेळी पाठपुरावा करीत सर्व तांत्रिक मान्यता प्राप्त करण्यात आल्या आहेत. केंद्राच्या बळीराजा जलसंजीवनी योजनेत वरखेडे लोंढे बँरेज चा समावेश झाल्याने या कामासाठी १००% निधीची भरीव तरतूद झाली.  हे काम वेळेत पूर्ण व्हावे यासाठी समुद्रात वापरल्या जाणाऱ्या आधुनिक पद्धतीचे तंत्रज्ञान व मशिनरी या ठिकाणी वापरण्यात येत आहे. यामुळे काँक्रिटीकरणाची गुणवत्ता अबाधित राहत असून वरखेडे लोंढे बँरेज प्रकल्प लवकरच पूर्ण होणार असल्याने शेतकरी राजा बरोबर मला देखील समाधान असल्याची भावना खासदार उन्मेष पाटील यांनी व्यक्त केली आहे.

Protected Content