Home Cities जळगाव पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जळगावात होणार जाहीर सभा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जळगावात होणार जाहीर सभा


modi 17
 

जळगाव (प्रतिनिधी) विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची 13 तारखेला जळगाव शहरात भव्य जाहीर सभा होणार आहे.

 

जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी दिलेल्या माहिती नुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी रविवारी (ता.13) जळगाव जिल्ह्यात येणार असून जळगाव शहरात त्यांची जाहीर सभा होईल. अद्याप सभेचे ठिकाण निश्चित नसले तरी दोन-तीन दिवसांत ते निश्चित करुन सभेचे नियोजन करण्यात येणार आहे. तसेच ही जाहीर सभा ऐतिहासिक ठरविणार असल्याचा विश्वासही ना.महाजन यांनी व्यक्त केला आहे. दरम्यान, या निवडणुकीसाठी भाजप-शिवसेना महायुतीच्या प्रचारार्थ अनेक स्टार प्रचारकही मैदानात उतरणार आहेत.


Protected Content

Play sound