मी संशयित दहशतवाद्याला उमेदवारी दिली असती तर? ; साध्वींवरुन मेहबूबांचा भाजपवर निशाणा

mufti sadhavi

जम्मू काश्मीर (वृत्तसंस्था) नुसतं विचार करा, आम्ही जर दहशतवादाचा आरोप असलेल्या व्यक्तीला तिकीट दिले असते तर ? किती राग व्यक्त झाला असता. देशातील चॅनल्स नुसते तुटून पडले असते. mehboobaterrorist हा हॅशटॅग तयार झाला असता. यांच्या म्हणण्यानुसार भगव्या धर्मांधतेवर येते तेव्हा दहशतवादाला धर्म नसतो. पण इतरवेळी सर्व मुस्लिम दहशतवादी असतात, असे टि्वट मेहबूबा मुफ्ती यांनी केले आहे.

 

मालेगाव बॉम्ब स्फोटातील आरोपी साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूरला भाजपामध्ये प्रवेश देण्याच्या निर्णयावर जम्मू-काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांनी टीका केली आहे. भाजपाने भोपाळमधून साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे भोपाळमध्ये आता दिग्विजय सिंह विरुद्ध साध्वी प्रज्ञा असा सामना रंगणार आहे. आज सकाळीच साध्वी प्रज्ञा यांनी भाजपामध्ये प्रवेश केला. भोपाळच्या जागेसाठी १२ मे रोजी मतदान होणार आहे. भोपाळ मतदारसंघ भाजपाचा बालेकिल्ला समजला जातो. मालेगावमध्ये २९ सप्टेंबर २००८ रोजी एका मशिदीबाहेर झालेल्या बॉम्बस्फोट प्रकरणात साध्वी प्रज्ञा आरोपी होत्या.

Add Comment

Protected Content