अरेच्चा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांसह अन्य मंत्र्यांचे बंगले ‘डिफॉल्टर’ !

मुंबई प्रतिनिधी । सर्वसामान्यांना मालमत्ता कर तसेच अन्य कर न भरल्यास कारवाईला सामोरे जावे लागते. मात्र राज्याचे मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री तसेच अन्य प्रमुख मंत्र्यांच्या निवासस्थानांची लाखो रूपयांची थकबाकी असून त्यांना महापालिकेचे डिफॉल्टर म्हणून घोषीत केल्याची धक्कादायक माहिती आरटीआयमधून समोर आली आहे.

आरटीआय कार्यकर्ते शकील अहमद शेख यांनी मुंबई महानगरपालिकेच्या संकेतस्थळवरावरून पाण्याच्या थकबाकीदारांची माहिती गोळा केली होती. यामध्ये मुख्यमंत्री व इतर मंत्र्यांच्या शासकीय आवासावर पाण्याच्या एकूण २४ लाख ५६ हजार ४६९ थकबाकी आहे.

त्यामध्ये राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (वर्षा बंगला), उपमुख्यमंत्री अजित पवार (देवगिरी), जयंत पाटील (सेवासदन), नितीन राउत, उर्जा मंत्री (पर्णकुटी), बाळासाहेब थोरात, महसूलमंत्री (रॉयलस्टोन), विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस (सागर), अशोक चव्हाण (मेघदूत) सुभाष देसाई, उद्योगमंत्री (पुरातन), दिलीप वळसे पाटील (शिवगिरी), सार्वजनिक बांधकाम(सार्वजनिक उपक्रम) मंत्री एकनाथ शिंदे (नंदनवन), राजेश टोपे (जेतवन), नाना पाटोळे, विधानसभा अध्यक्ष (चित्रकुट),  राजेंद्र शिंगे (सातपुडा), नवाब मलिक (मुक्तागीरी), छगनराव भुजबळ (रामटेक), रामराजा निंबाळकर विधानभवन सभापती (अजंथा) आणि सह्याद्री अतिथीगृहचे नावे आहेत.

यामुळे या सर्व बंगल्यांना मुंबई महापालिकेने डिफॉल्टरच्या यादीत टाकले आहे.

Protected Content