आम्ही सर्वजण शरद पवार यांच्यासोबत- जयंत पाटील

jayant patil

मुंबई प्रतिनिधी । अजित पवार यांच्या निर्णयाबाबत आपल्याला काहीही माहिती नव्हती असे नमूद करून आम्ही सर्वजण शरद पवार यांच्यासोबत असल्याचे प्रतिपादन राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये शरद पवार आणि अजित पवार यांचे गट वेगळे झाल्याचे आता स्पष्ट होऊ लागले आहे. या पार्श्‍वभूमिवर, पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आज प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले की, अजित पवार यांच्या निर्णयाबाबत आपल्याला काहीही माहिती नव्हती. अर्थात, काहीही झाले तरी आम्ही सर्व जण शरद पवार यांच्यासोबत राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!