उध्दव ठाकरे यांनीही हेच केले होते- भाजपचे जोरदार प्रत्युत्तर

मुंबई प्रतिनिधी । शिवसेनेने भाजपच्या भूमिकेवर टीकास्त्र सोडल्यानंतर त्यांना लागलीच जोरदार प्रत्युत्तर देण्यात आले असून उध्दव ठाकरे यांनी आधी सहाय्यता निधीऐवजी पक्षाच्या निधीत वेतनाची रक्कम जमा केली होती याची आठवण करून देण्यात आली आहे.

याबाबत वृत्त असे की, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पोलिसांच्या कठोर भूमिकेवर टीका केली होती. तसेच भाजपच्या लोकप्रतिनिधींनी आपले एक महिन्याचे वेतन हे मुख्यमंत्री सहाय्यता निधीस देण्याऐवजी भाजप राहत कोषला दिले होते. या दोन्ही कारणांवरून सामनातील अग्रलेखातून यावर जोरदार टीका करण्यात आली आहे. याला भाजपने लागलीच प्रत्युत्तर देण्यात आले आहे.

या संदर्भात महाराष्ट्र भाजपने एक ट्विट केले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जेव्हा फक्त पक्षप्रमुख उद्धव ठाकरे होते, तेव्हा सत्तेत सहभागी असताना देखील त्यांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधी ऐवजी पक्षाच्या मदतनिधीस प्राधान्य देण्यासाठी आमदार, मंत्र्यांना आदेश दिले होते. अग्रलेख लिहितांना संजय राऊत यांना याचा विसर पडला अशी टीका भाजपानं केली आहे. यासोबतच याच ट्विटमध्ये त्यावेळच्या एका बातमीचा फोटोही शेअर केला आहे.

Protected Content