Home आरोग्य फैजपुरातील रस्त्यांवर बाहेरच्यांसाठी ‘नो एंट्री’चे बोर्ड !

फैजपुरातील रस्त्यांवर बाहेरच्यांसाठी ‘नो एंट्री’चे बोर्ड !

0
33

फैजपूर, ता. यावल निलेश पाटील । कोरोनामुळे लावण्यात आलेल्या लॉकडाऊनच्या पार्श्‍वभूमिवर, शहरातील काही रस्ते हे बाहेरच्या लोकांसाठी पूर्णपणे बंद करण्यात आले असून असे बोर्ड देखील लावण्यात आले आहेत.

जळगावच्या मेहरूण परिसरातील एका नागरिकाची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्याने संपूर्ण जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. शहरातील नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे. याच दरम्यान फैजपूर शहरातील काही भागातील रस्ते नागरिकांनी पूर्णपणे बंद करून अनोळखी व्यक्तीला प्रवेश मिळणार नाही असे सूचनाफलक बघायला मिळाले आहे. आपल्या परिसरात अनोळखी व्यक्ती येऊ नये याची दक्षता रहिवाशांनी घेतली असून आपल्या भागात येणारे रस्ते काही ठिकाणी बंद करण्यात आलेले आहेत. दक्षिण बाहेर पेठ, सिंधी कॉलनी, सुतार वाडा या भागातील रस्ते नागरिकांनी पूर्ण बंद करून अनोळखी व्यक्तीला आत प्रवेश मिळणार नाही असे सूचना फलक लावण्यात आलेले आहे.

दरम्यान, अत्यावश्यक सेवांचे स्टीकर लावून दुचाकीवर विनाकारण कारणाने नागरीक शहरात फिरतांना दिसत आहे. दुचाकीवर लावण्यात आलेले अत्यावश्यक सेवा औषधी यांचे पूर्णपणे खात्री करून त्या दुचाकी चालकांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी नागरिक करीत आहेत.


Protected Content

Play sound