केरळ सरकारकडून तळीरामांना दिलासा ; डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनवर दारू देण्याचे आदेश

 

केरळ (वृत्तसंस्था) लॉकडाउनमुळे दारूची दुकाने बंद असल्याने केरळमध्ये पाच मद्यपींनी आत्महत्येचा प्रयत्न केल्यानंतर खळबळ उडाली होती. त्यामुळे डॉक्टरांचे प्रिस्क्रिप्शन असेलेल्यांना लॉकडाऊनच्या काळात दारू देण्याचा निर्णय केरळ राज्य सरकारने घेतला आहे.

 

संपूर्ण देशभरात लॉकडाऊन झाल्यानंतर केरळमधील तळीरामांची चांगलीच कोंडी झाली होती. सगळीकडे दारुची दुकानं बंद असल्यामुळे, गेल्या ५ दिवसांमध्ये ५ तळीरामांनी आत्महत्येचा प्रयत्न केला होता. यात एकाचा मृत्यू झाल्यामुळे खळबळ उडाली होती. राज्यात विविध भागात मद्यपींच्या आत्महत्येच्या वाढत्या घटना लक्षात घेऊन केरळचे मुख्यमंत्री विजयन यांनी दारूचे व्यसन जडलेल्यांना दारू देण्याचा निर्णय घेतला आहे. यानुसार ज्यांच्याकडे डॉक्टरांचे प्रिस्क्रिप्शन असेल अशा मद्यपींना दारू विक्री करण्याचे आदेश मुख्यमंत्री विजयन यांनी उत्पादन शुल्क विभागाला दिले आहेत.

Protected Content