मोदींनी साध्वी प्रज्ञा यांना उमेदवारी दिलीच कशी ? : ओवेसी

owaisimoidsadhvipragya

 

 

औरंगाबाद (वृत्तसंस्था) पंतप्रधान नरेंद्र मोदींना जर खरंच दहशतवादाविरोधात लढा द्यायचा असता तर त्यांनी साध्वी प्रज्ञा यांना उमेदवारीच दिली नसती, अशा शब्दात एमआयएमचे नेते असदुद्दीन ओवेसी यांनी मोदींवर टीकास्त्र सोडले आहे. दरम्यान, भाजपाने मालेगावमधील २००८ च्या बॉम्बस्फोटातील प्रमुख आरोपी साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांना भोपाळमधून उमेदवारी जाहीर केल्याने वाद निर्माण झाला आहे.

 

गुरुवारी ओवेसी यांनी औरंगाबादमध्ये प्रचारसभा घेतली. या प्रचारसभेत त्यांनी प्रज्ञा साध्वी यांच्या उमेदवारीवरुन भाजपावर टीका केली. ते म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे खोटे बोलणाऱ्यांचे राजा आहेत. त्यांच्या इतका खोटारडा माणूस मी बघितला नाही. त्यांना दहशतवादाविरोधात लढा द्यायचा नाही. जर तुम्हाला खरंच दहशतवादाविरोधात लढा द्यायचा होता आणि तुमची ही प्रामाणिक इच्छा होती, तर तुम्ही दहशतवादाचे आरोप असलेल्या व्यक्तीला उमेदवारीच दिली नसती, असे त्यांनी म्हटले आहे. प्रज्ञा सिंह यांच्यावर दहशतवादाचा आरोप आहे. मग त्यांना उमेदवारी का दिली. तुम्हाला दुसरा उमेदवार सापडला नाही का?, असा सवालही त्यांनी विचारला.

Add Comment

Protected Content