शेअर बाजारात भूकंप ; गुंतवणूकदारांचे 1.39 लाख कोटी बुडाले

240610 share market down

 

मुंबई (वृत्तसंस्था) आज दुपारी शेअर बाजारात भूकंप आला. सव्वातीन वाजेच्या सुमारास सेन्सेक्समध्ये तब्बल ८०० अंकांची घसरण तर निफ्टीत २४.४० अंकांची घसरण नोंदवली गेली. बँकांचे विलिनीकरण, घसरलेला जीडीपी आणि मंदीची पार्श्वभूमी या सर्वाचा परिणाम सेन्सेक्सवर पाहायला मिळाला. गुंतवणूकदारांचे आज तब्बल 1.39 लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे.

 

सुरुवातीच्या सत्रात सकाळी १०.२२ वाजता सेन्सेक्स ४१३.५८ अंकांनी घसरून ३६, ९१९.२१ अंकांवर व्यवहार सुरू होते. निफ्टीतही १२९.३० अंकांची घसरण नोंदवली होती. दरम्यान, उत्पादन क्षेत्रात ऑगस्टमध्ये विक्री घटल्याने शेअर बाजारात निराशा आहे. उत्पादन घटल्याने केलेली गुंतवणूक आणि खर्च यातील नुकसानही अद्याप भरून निघाले नाही. याआधी जूनच्या तिमाहीत जीडीपी दर सहा वर्षांतील निच्चांकीवर पोहोचले होते. जीडीपी दर अपेक्षेपेक्षा कमी; तसेच इतर महत्वाच्या क्षेत्रांत कासवगतीने सुरू असलेल्या विकासाचा परिणाम शेअर बाजारावर झाला आहे. शेअर बाजार कोसळल्याने गुंतवणूकदारांना मोठा फटका बसला. गुंतवणूकदारांचे तब्बल 1.39 लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे.

Protected Content