अरे वा ! : जिल्ह्यातील 105 हून अधिक सोसायट्यांची शंभर टक्के वसुली

 

जळगाव, लाइव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी – जिल्हा बँकेतर्गत 877 विकासो पैकी 105 हुन अधिक विकासो ची 100 टक्के पीककर्ज वसुली झाली असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. यात अजून सोसायट्यांची वाढ होण्याची शक्यता जिल्हा बँक अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.

जिल्हा बँकेमार्फत ग्रामीण भागात शेतकरी सभासदांना विकासो मार्फत 6 टक्के दराने अल्प, मध्यम मुदत पीक कर्ज, वितरित केले जाते. यावर्षी शेतकरी सभासदाना सन 2021-22 अंतर्गत वितरित करण्यात आलेले पीक कर्ज 31 मार्च 2022 पूर्वी मुदतीच्या आत परतफेड केल्यास शून्य टक्के व्याज आकारणी केली जाणार असल्याचे जाहीर करण्यात आले होते. त्यानुसार 31 मार्च 2022 रोजी दुपारी 3 वाजेपर्यंत जिल्यातील विकासो मधील सभासदांनी कर्ज परतफेड केली असून सुमारे 105 पेक्षा अधिक विकासो च्या शेतकरी सभासदांनी त्यांच्या पीक कर्ज रकमेचा भरणा करून जिल्हा बँकेचे पीक कर्ज 100% परतफेड केली असून ते सभासद नवीन पीक कर्ज घेण्यासाठी पात्र झाले आहेत.

Protected Content